टोकियो, जपान :

आपल्या व्यवसायावर परिणाम न होता करोना संक्रमण रोखण्यासाठी जपानची राजधानी टोकियोमधल्या एका हॉटेलनं ग्राहकांसाठी अनोखी सुविधा सुरू केलीय. या सुविधेमुळे जपानचे नागरिक आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत बाहेर जेवण्याचा आनंद सहजच घेऊ शकतात. तेही कोणत्याही प्रकारचा धोका टाळून…

टोकियोतल्या ‘होशिनोया टोकियो‘मध्ये या हॉटेलनं ‘Lantern Dining Experience’ नावानं ही सुविधा सुरू केलीय.

करोना संक्रमणापासून स्वत:ला दूर ठेवत स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याचा हा नवीन प्रयोग खवय्यांच्याही पसंतीस उतरतोय.

Omicron Variant: तब्बल ५७ देशांत फैलावला करोनाचा नवा व्हेरियंट, WHO कडून इशारा
ओमिक्रॉनचा धोका संपला नाही! WHO कडून नवीन अलर्ट जारी, प्रत्येकाला केलं आवाहन
यामध्ये, एखाद्या कंदिलाच्या आकाराच्या एका पारदर्शक टेबल कपाटात ग्राहकांना जेवण घेता येतं. ही कपाटं जपानच्या पारंपरिक शिल्पकारांनी बनवले आहेत.

३०००० येन म्हणजेच जवळपास १९ हजार रुपये मोजून ग्राहक इतरांसोबत जेवणाचा आस्वाद घेऊन शकतात.

इतर देशांप्रमाणेच जपानमध्येही नागरिकांनी करोना संक्रमणाची धास्ती घेतलीय. देशात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काही शेकड्यांत असणारा आकडा सध्या लाखांवर पोहचलाय. १ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी जपानमध्ये १.४२ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. बुधवारी टोकियोमध्ये पहिल्यांदा २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली.

Pakistan: ‘भारतात निघून जा’ म्हणत पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्याची हत्या
सुटकेचा नि:श्वास! न्यूझीलंडची ‘ती’ गर्भवती पत्रकार मायदेशी परतणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here