इदलिब, सीरिया :

थंडीत गारठून एका अवघ्या सात दिवसांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर येतेय. सीरियातील विद्रोहिंच्या ताब्यात असलेल्या इदलिब या शहरात ही घटना घडलीय. या चिमुरडीच्या मृत्युमुळे विस्थापितांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

विस्थापितांसाठी उभारण्यात आलेल्या शिबिरांत या चिमुरडीच्या कुटुंबानं आसरा घेतला होता. मात्र, थंडीत गारठून चिमुरडीनं आपले प्राण सोडले आणि तिच्या कुटुंबाकडे हताशपणे तिचा मृतदेह पाहण्यापलिकडे पर्याय उरला नाही.

मोहम्मद अल हसन यांची सात दिवसांची मुलगी फातिमा हिचा मृत्यू झालाय. ‘मी माझ्या मुलीला हातात घेतलं तेव्हा ती बर्फासारखी थंड पडली होती. थंडीच्या दिवसांत स्वत:ला वाचवण्यासाठी आम्ही काही तयारी केली होती. परंतु, ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या वस्तू आमच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. आमच्या हातात कोणतंही काम नाही त्यामुळे आम्हाला पैशांचीही चणचण भासतेय’, असं म्हणत हसन यांनी आपली निराशा आणि दु:ख व्यक्त केलंय.

मोहम्मद हसन यांनी आपल्या मुलीला रुग्णालयातही हलवलं परंतु दुर्दैवानं तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. मोहम्मद यांचं कुटुंब सात दिवसांपूर्वी दक्षिण अलेप्पो शहरातून विस्थापित होऊन इदलिबला दाखल झालंय. एका तंबूत या कुटुंबानं आसरा घेतलाय.

Omicron Variant: तब्बल ५७ देशांत फैलावला करोनाचा नवा व्हेरियंट, WHO कडून इशारा
ओमिक्रॉनचा धोका संपला नाही! WHO कडून नवीन अलर्ट जारी, प्रत्येकाला केलं आवाहन
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा ती निळी पडली होती. तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होतं.

सीरियाच्या युद्धात आपला जीव वाचवत अनेक सीरियन नागरिकांनी इदलिबमध्ये आसरा घेतला आहे. युद्धामुळे अगोदरच आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या या लोकांना आता थंडीतही आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवणं कठिण होऊन बसलंय.

मुलांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना ‘सेव्ह द चिल्ड्रन’कडून या चिमुरडीच्या मृत्युवर शोक व्यक्त करण्यात आलाय. ‘हा मृत्यू अत्यंत दु:खद असून असे मृत्यू रोखले जाऊ शकले असते’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया संघटनेकडून व्यक्त करण्यात आलीय.

सीरियामध्ये युद्ध प्रारंभ होऊन जवळपास ११ वर्ष उलटलेत. २०११ साली सुरू झालेल्या विद्रोहानंतर आतापर्यंत जवळपास पाच लाख लोक मृत्युमुखी पडलेत तर लाखोंच्या संख्येत जनता विस्थापित झालीय.

गेल्या दोन आठवड्यांपासून कडाक्याच्या थंडीनं उत्तर – पश्चिम सीरिया गारठलंय. या भागात सीरियातील बशर अल असद सरकारच्या सेनेपासून आपला जीव वाचवत जवळपास ४० लाख लोक विस्थापित म्हणून दाखल झालेले आहेत. यातील जवळपास १७ लाख लोकांना राहण्यासाठी घरं आणि हाताला काम नाही.

संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार, इदलिबमध्ये राहणंही आता लोकांसाठी कठिण होऊन बसलंय. इथली ९७ टक्के जनता गरीबीत होरपळतेय. इदलिबच्या ८० टक्के लोकांना रोज जेवण पुरवलं गेलं नाही तर त्यांचा भुकेनं तडफडून मृत्यू होईल. तुर्कीच्या लीरा संकटामुळे इथली परिस्थिती आणखीनच भयानकतेकडे वाटचाल करतेय. इदलिबमध्ये आतापर्यंत पोहचणारी आंतरराष्ट्रीय मदतही कमी झालीय. या भागात महागाईनं कळस गाठलाय. खाद्यपदार्थ, औषध, इंधन आणि इतर जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती बेरोजगार आणि सामान्यांच्या लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्यात.

कंदिलात जेवण! करोनाला दूर ठेवण्यासाठी जपानी हॉटेलची अनोखी युक्ती
​गुजरातपासून ६० किमी अंतरावर पाकिस्तानात सापडलं ‘काळ्या सोन्याचं’ घबाड, नशीब पालटणार​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here