: हॉटेल व्यावसायिकांच्या मित्राने एका युवतीची त्याच्याशी ओळख करुन दिली आणि त्यानंतर सदर युवतीने हॉटेल व्यावसायिकास हनी ट्रॅपमध्ये अडकवत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकी वारंवार देऊन त्याला ब्लॅकमेल केले. अखेर हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव देऊन फिर्याद दिल्यावर दोन महिलांसह चौघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

हॉटेल व्यावसायिकाला भुरळ घालवून युवतीने कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील हॉटेल ग्रीन फिल्ड आणि हॉटेल साईसूट येथे भेटायला बोलावले. हॉटेल व्यावसायिक आणि युवती बोलत असताना अजित संभाजी निंबाळकर (रा. सुभाषनगर), चंदू शिंदे आणि एक महिला तिथे आली. त्यांनी हॉटेल व्यावसायिकाचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन बदनामी करण्याची धमकी दिली. तसंच दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.

रक्कम न दिल्यास युवतीने बरे-वाईट करण्याची धमकी दिली. खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकास धमक्या येऊ लागल्याने त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन महिलासह अजित निंबाळकर आणि चंदू शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अशा प्रकारचे कोणी हनी ट्रॅपच्या गुन्ह्यात अडकवून खंडणी मागितली असल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असं आवाहन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here