अँटिग्वा: भारताने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य सामन्यात भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान होते पण हे आव्हान लिलया पार केले असून ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आता शनिवारी विजेतेपदासाठी आणि यांच्यात महामुकाबला होणार आहे. ( )
भारतीय संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनी चोख कामगिरी पार पाडत विजय खेचून आणला. भारताने प्रथम फलंदाजी करताना यशचं खणखणीत शतक (११० धावा) आणि रशीदचं अर्धशतक (९४ धावा) याच्या जोरावर २९० धावा केल्या व ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १९४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि ९६ धावांनी भारताने दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने चौथ्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून जेतेपदाच्या लढाईत भारतापुढे इंग्लंडचे आव्हान असणार आहे. ही लढत शनिवारी होणार आहे.