मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली. रमेश देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रमेश देव (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांत काम केले होते. त्यातही पत्नी सीमा देव यांच्यासोबतचे सारेच सिनेमे हिट झाले होते.

अशी घडली रमेश आणि सीमा देव यांची लाखातली एक लव्ह स्टोरी

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी अमरावती येथे झाला असला तरी त्यांचे लहानपण कोल्हापूरमध्ये गेले. रमेश देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केले होते. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. रमेश देव यांच्या वडिलांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. वकील झाल्यानंतर रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू लागले. शाहू महाराजांना रमेश देव यांच्या वडिलांनी मदत केली. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, ‘ठाकूर, तुम्ही देवासारखे मला भेटलात… तुम्ही आजपासून ठाकूर नाही-देवच!’ तेव्हापासून ठाकूर कुटुंबाचे आडनाव देव झाले.

रमेश देव- सीमा देव

सदाबहार जगण्याचे सूर हरपले! गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

रमेश देव यांचे गाजलेले हिंदी सिनेमे

आज़ाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इण्डिया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इलज़ाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशान्ति, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हीरालाल पन्नालाल, यही है ज़िन्दगी, फकीरा, आखिरी दांव, सुनहरा संसार, ज़मीर, एक महल हो सपनों का, सलाखें, ३६ घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज़, कसौटी, जैसे को तैसा, ज़मीन आसमान, जोरू का गुलाम, बंसी बिरजू, यह गुलिस्ताँ हमारा, हलचल, मेरे अपने, संजोग, बनफूल, आनन्द, दर्पण, खिलौना, जीवन मृत्यु, शिकार, सरस्वतीचन्द्र, मेहरबाँन या सिनेमांमध्ये काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here