पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ‘टीईटी’चा २०१९-२०च्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एका वर्षांने शिक्षण परिषदेने २८४ जणांना पात्र ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ‘टीईटी’ गैरव्यवहारात शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तपासादरम्यान राज्य शिक्षण परिषदेतील सर्व पत्रव्यवहार ताब्यात घेतला आहे. त्यात २०२१मध्ये विभागीय कार्यालयांना पाठविलेले एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे.

पिंपरीत खळबळ! भाजप नगरसेवकाला पोलिसांकडून अटक; ‘या’ प्रकरणात केली कारवाई
राज्य शिक्षण परिषदेने १९ जानेवारी २०२० रोजी ‘टीईटी’चा निकाल जाहीर करून त्यात १६ हजार ५९२ जणांना पात्र ठरविले. पोलिस तपासात त्यात सात हजार ८८० जणांची नावे घुसडून त्यांना पात्र ठरविल्याचे दिसून आले. त्यानंतर आता तपासात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता त्यात नव्याने नावे समाविष्ट करता येत नसल्याने एक वर्षानंतर २८४ जणांची यादी विभागीय कार्यालयांना पाठविण्यात आलली. त्यांना ‘टीईटी’चे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात पोलिस कसून तपास करीत असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मागचा अनुभव पाहिला तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here