औरंगाबाद : मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या अतिउत्साही मित्रांचा कारनामा एका नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे. कारण, हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार आणि जांबिया (चाकू) घेऊन नाचणाऱ्या मित्रांसह नवरदेवावर औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी रेणुकानगर परिसरात बिबीशन अनिल शिंदे (२१) याच्या हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमात बिबीशनचे मित्र यश साखरे (१९), शेख बादशाह (२२), शुभम मोरे (२२), किरण रोकडे (२२, सर्व रा. रेणुकानगर) आणि वसीम शेख (२०, रा. लतीफनगर) हेही कार्यक्रमात आले होते. मग डान्स सुरू झाला आणि वसीम शेख याने तलवार आणि शुभम मोरे याने दोन जांबिया बाहेर काढले. ‘मेरी यार की शादी है’ असा जल्लोष सुरू होता. हातात तलवार आणि जांबिया घेऊन नवरदेवासह त्याचे मित्र बेधुंद नाचत होते.

Weather Alert : येत्या ३ दिवसांत देशावर आस्मानी संकट, ‘या’ राज्यांना पाऊस-बर्फवृष्टीचा इशारा
पण याचवेळी मोबाईलमध्ये कुणीतरी व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आणि व्हिडीओ व्हायरल झाला. व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिसांपर्यंत सुद्धा पोहचला. पोलिसांनी व्हिडीओमधील व्यक्तींचा शोध सुरू केला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी बिबीशन शिंदेसह त्याचा मित्राला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र मित्रांच्या कारनाम्यामुळे लग्नात लागलेल्या हळदीच्या पिवळ्या हातात बेड्या पडल्याची चर्चा परीसरात पाहायला मिळाली.
‘वाइन व दारुतला फरक शरद पवारांनीच समजावून सांगावा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here