मुंबई : वाइन आणि दारुमधील फरक मला समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तो समजावून सांगावा. किराणा दुकानांमध्ये वाइन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना वाइनबाबतच्या निर्णयावर भाष्य केले होते, त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वाइनविक्री निर्णयाच्या समर्थनावरून सरकारवर टीका केली. वाइन म्हणजे दारू नाही असे सांगणे हा काय तमाशा सुरू आहे ते कळत नाही. छाप्यात गांजा सापडला की त्याला हर्बल तंबाखू म्हणायचे. तसेच आता वाइन म्हणजे दारू नव्हे असे समर्थन सुरू आहे. वाइन ही दारू नसेल तर दारुच्या दुकानावर वाइन शॉप असा बोर्ड लावू नका. त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असे काहीही म्हणा. वाइनचा निर्णय हा मूठभर लोकांचे भले करण्यासाठी घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतल्याचे दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी राज्यात गेल्या दोन वर्षांत शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काय केले ते सांगा असा प्रश्नही त्यांनी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मागचा अनुभव पाहिला तर…
इंधन दरकपात कधी?

मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करीत दिलासा दिल्यानंतर त्या पाठोपाठ २२ राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा दिला. मात्र महाराष्ट्रात अद्याप पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. आता या विषयावर मोठे आंदोलन झाल्यावरच या सरकारचे डोळे उघडतील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील एक लाख ८० हजार भाजप नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून केंद्रीय अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजावून दिला. महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी हा संदेश गावोगावी पोहोचवतील, असेही पाटील यांनी सांगितले.
वर्ध्यातील ७ भावी डॉक्टरांच्या अपघातापूर्वीचा VIDEO आला समोर, दृश्य पाहून तुम्हीही हादराल
राज्याला मोठा दिलासा, करोनासंदर्भात आली महत्त्वाची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here