जालना : जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील कापसाचे व्यापारी जनार्दन चपटे यांनी जालन्यातील एच. डी. एफ. सी बँकेतून कापसाचे शेतकऱ्यांना देण्यासाठी ९ लाख रुपये विड्रॉल करून बदनापूर शहराकडे घेऊन येत असताना बदनापूर शहराच्या धोपटेश्वर फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी दुचाकी वरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला तुमचे २ हजार खाली पडल्याचं सांगुन त्यांची दुचाकी थांबवली.

हळदीला मित्रांनी असं काही केलं की नवरदेवच तुरुंगात, VIDEO पाहून तुम्हीही हादराल
चोरट्यांच्या या थापेला ज्ञानेश्वर चपटे भुलले आणि त्यांनी त्यांची दुचाकी थांबवून पैसे कुठे पडले हे बघण्यासाठी वळताच चोरट्यांनी मोटारसायकलला लटकवलेली ९ लाखाची बॅग पळवून नेली. ही घटना सायंकाळी ७च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील cctv मध्ये हा प्रकार कैद झाला असून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीचा तपास पोलीस करीत आहेत.

‘वाइन व दारुतला फरक शरद पवारांनीच समजावून सांगावा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here