औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात अंगावर शहारा आणणारा प्रकार समोर आला आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तर याबाबत विचारणा करणाऱ्या पत्नीला सुद्धा या नराधमाने मारहाण केली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात बाळ लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर हा सर्व प्रकार मुलीच्या आईला समजला असता तिने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली. मात्र या नराधमाने पत्नीलाही मारहाण करत तिच्या डोक्यात परशीचा तुकडा मारला. ज्यात फर्यादी महिला जखमी झाली. त्यानंतर महिलेने वाळूज पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व हकीकत सांगत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपीला सुद्धा अटक केली आहे.