मुंबई: एचडीआयएल या कंपनीद्वारे म्हाडाच्या जमिनीवरील घोटाळा प्रकरणात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना बुधवारी अटक केली असतानाच, दुसऱ्या दिवशी, गुरुवारी ईडीने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. याच १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आता ईडीने सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापे मारले. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असल्याचे समजते.

एएनआयच्या वृत्तानुसार, सुजित पाटकर हे ईडीच्या अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत. वाइन वितरक कंपनी मॅगपाई डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पाटकर आणि संजय राऊत यांच्या मुलींची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे. याच पाटकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज, गुरुवारी ईडीच्या पथकाने छापे मारले.

sanjay raut : ‘ईडी’च्या कारवाईवरून संजय राऊतांचा संताप; म्हणाले, ‘कुछ मिला क्या…?’
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने केली अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

प्रवीण राऊतला बुधवारी ईडीकडून अटक

गुरूआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएल कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीला गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे कंत्राट म्हाडाकडून मिळाले होते. या कामासाठी कंपनीचे संचालक प्रवीण राऊत हे मध्यस्थाचे काम करत होते. परंतु गुरूआशीष कंपनीने हा पुनर्विकास न करता जमिनीवरील एफएसआयची बाजारात १०३४ कोटी रुपयांना विक्री केली. प्रवीण राऊत यांनी म्हाडातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही विक्री केल्याचे ‘ईडी‘च्या तपासात समोर आले आहे. त्यामुळेच ‘ईडी’ने बुधवारी छापा टाकून राऊत यांना अटक केली. त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, प्रवीण राऊत यांचा वर्षा संजय राऊत यांच्याशीही संबंध असल्याचे याआधी समोर आले आहे. घोटाळा झालेल्या पीएमसी बँकेने गुरूआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रवीण राऊत यांच्या मध्यस्थीने एचडीआयएलमार्फत कर्ज दिले. त्यापैकी १.६० कोटी रुपयांची रक्कम प्रवीण राऊत यांनी पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवली. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले होते. त्या रक्कमेतून वर्षा यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. याच प्रकरणी वर्षा राऊत यांचीही ‘ईडी’ने चौकशी केली होती. परंतु नंतर वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपयांच्या रक्कमेची परतफेड केली.

kcr slams bjp : ‘भाजपला बंगालच्या उपसागरात बुडवू’, केसीआर यांचा घणाघात, आठवलेंचा हल्लाबोल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here