औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेल्या महिन्याभरात तीनशेपेक्षा अधिक महिलांनी प्रवेश घेतला आहे. यात बुधवारी शहरातील संजयनगर, शिवशाहीनगर, जयभवानीनगर, मुकुंदनगर, विश्रांतीनगर इत्यादी विभागातील महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी सुनीता पालवे, छाया धनेधर, कांताबाई खंडाळे, पिंकी सिंग, मीना पाटेकर आदींनी पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिनाभरात अनेक महिलांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे कुठेतरी पक्षाची ताकद वाढल्याचीही राजकीय चर्चा आहे.