मुंबई: दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच राधिका मदान हिनं सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचं नेहमी कौतुक झालं आहे. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं तिच्या शूटिंगदरम्यानचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

राधिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केलाय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी दिग्दर्शकानं तिला गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्यास सांगितलं होतं. या गोळ्या खरेदी करण्यामागंच कारणही तिनं सांगतिलं. दिग्दर्शकानं या गोळ्या खरेदी करायला सांगितल्या तेव्हा मी गोंधळले होते. मला काही समजत नव्हतं. पण त्यानंतर मला समजलं की हा माझ्या चित्रपटातील पहिला शॉट होता.घरी गेल्यानंतर आई-वडिलांना भेटले. तेव्हा त्यांना देखील त्या गोळ्या पाहून धक्का बसला होता. त्यानंतर दोघेही बराचवेळ शांत होते. त्या गोळ्यांकडं पाहात होते, असा किस्सा राधिकानं शेअर केला आहे.
‘पुष्पा’ सिनेमासाठी अल्लु अर्जुनने चोरली शहनाज गिलची स्टाइल हा व्हिडिओ आहे पुरावा

ऑडिशन द्यायला आवडतात
राधिका आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत असली तरी तिला अजूनही ऑडिशन द्यायला आवडतात असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं. प्रत्येक कलाकाराला एक योग्य संधी मिळाली पाहिजे असं तिला वाटतं. मेहनत घेऊन काम करण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातच नाही; असं ती आवर्जून सांगते. आजवर राधिकानं मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र प्रभावशाली अभिनयामुळं तिनं प्रेक्षकांची आणि समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. पण, अजूनही तिला इतर स्ट्रगलिंग कलाकारांसारखं ऑडिशन देऊनच काम करायला आवडतं. याविषयी ती सांगते, ‘मला ऑडिशन देण्याची संधी मिळत असेल तर मी ऑडिशन देते. कारण ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळं तुम्ही त्या पात्राला योग्य न्याय देऊ शकता.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here