कल्याण : कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवरील बँक ऑफ बडोदासमोरील सुमारे ७० फूट उंचीच्या एका ताडाच्या झाडाला मांजात घार अडकली होती. सकाळपासून घार या मांजातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन जवानांनी मांजामध्ये अडकलेल्या या घारीची सुखरूप सुटका केली.

कल्याण पूर्वेकडील पुना लिंक रोडवर बँक ऑफ बडोदासमोर एक ताडाचे झाड आहे. या ताडाच्या झाडावर सुमारे ७० फूट उंचावर मांजामध्ये एक घार अडकली होती. सकाळपासून या घारीचा सुटकेसाठी प्रयत्न सुरू होता. येथील स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान शिडी आणि इतर साहित्य घेऊन आले. त्यानंतर जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

डोंबिवलीतील प्रदूषण दूर होणार, ‘ते’ कारखाने होणार स्थलांतरित
Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले-रिक्षाचालकांमध्ये हाणामारी

कल्याण पूर्वेला पुना लिंक रोडवर गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ताडाच्या झाडावर ७० फूट उंचावर मांजामध्ये घार अडकल्याचे काही स्थानिकांनी बघितले. त्यांनी तातडीने याबाबत अग्निशमन दलाला कळवले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ड कार्यालयातील अग्निशमन दल प्रमुख संजय आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजल्यापासून अडकलेल्या घारीच्या सुटकेसाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, ७० फुटांपर्यंत शिडी पोहोचत नव्हती. तसेच झाडाच्या बाजूलाच अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या असल्यामुळे या घारीची सुटका करण्यात अडथळे येत होते. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूच्या इमारतीवरून बांबू आणि दोराच्या साह्याने या घारीला जवळ आणले. त्यानंतर या मांजातून तिची सुखरूप सुटका केली. घारीला किरकोळ दुखापत झाली आहे. घारीची सुटका केल्यानंतर तिला प्राणी-पक्षी मित्रांकडे सोपवण्यात आले. दरम्यान, सुमारे तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मांजात अडकलेल्या घारीची सुटका करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.

Dombivli Fraud : २४ कोटींच्या रकमेचा चेक सादर केला; बँक मॅनेजरला संशय आल्यानंतर बिंग फुटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here