मनामा, बहरीन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बहरीनचे पंतप्रधान सलमान बिन हमाद अल खलिफा यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान उभयदेशांतील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. राजकीय, व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रातील संबंधांतील स्थिर प्रगतीसंबंधी दोघांनीही समाधान व्यक्त करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांमधील या फोन संभाषणात प्रिन्स खलिफा यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलीय.

भारत आणि बहरीन हे दोन्ही देश २०२१ – २२ मध्ये आपांपसातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहेत.

बहरीनच्या पंतप्रधानांना भारत भेटीचं निमंत्रण

पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ संक्रमणकाळात बहरीनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची तसंच त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी बहरीनच्या नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. या संभाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी बहरीनचे सुलतान हमाद बिन इसा अल खलिफा यांना शुभेच्छा पाठवल्या आणि पंतप्रधान सलमान बिन हमाद अल खलिफा यांना भारत भेटीचं निमंत्रण देण्यात आलंय.

मंदिरासाठी जागा दिल्याबद्दल धन्यवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून या संवादाची माहिती दिली. ‘युवराज आणि बहरीनचे पंतप्रधान एचआरएच युवराज सलमान बिन हमाद अल खलिफा यांच्याशी चर्चा झाली. स्वामीनारायण मंदिरासाठी जमीन वाटपाच्या अलीकडील निर्णयासह भारतीय समुदायाच्या गरजांकडे लक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मंदिराचं बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची बातमीही त्यांनी बहरीनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना दिली. याअगोदर दुबई आणि अबुधाबी इथंही मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलंय.

Covid19: एकदा करोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर पुन्हा चाचणी गरजेची? तज्ज्ञ म्हणतात…
Humanitarian Crisis: सात दिवसांच्या चिमुरडीचा थंडीत गारठून मृत्यू, विस्थापितांचा प्रश्न ऐरणीवर
दुबईत भव्य मंदिर बांधले जात आहे

संयुक्त अरब अमिरातमध्ये अनेक भारतीयांची कामाच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत. दुबईसारख्या शहरात नोकरी किंवा अभ्यासाच्या निमित्तानं राहणाऱ्या हिंदूंची संख्याही मोठी आहे.

दुबईमध्ये येत्या काही महिन्यांत हिंदूंसाठी एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे. या मंदिराचं जवळपास ५० टक्के बांधकाम पूर्ण झालंय. हे मंदिर दुबईच्या जेबेल अली भागात उभारलं जातंय. मंदिराची पायाभरणी २९ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आली होती. आता या मंदिराची रचना आकार घेऊ लागलीय.

मंदिरासाठी ८८८ कोटींचा खर्च

मंदिर व्यवस्थापनानं बांधकामाबाबत अपडेट देण्यासाठी गेल्या वर्षी एक व्हिडिओ जारी केला होता. दुबईच्या ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट अथॉरिटी’नुसार, जेबेल अली गुरु नानक दरबार गुरुद्वाराच्या शेजारी असलेले हे मंदिर ‘बूर दुबई’मधील सिंधी गुरू दरबारचा विस्तार आहे. दुबईशिवाय अबुधाबीमध्येही एका हिंदू मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ (BAPS) ४५० दिरहम म्हणजेच सुमारे ८८८ कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्याचं काम करत आहे.

संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबुधाबीमध्ये उभारलं जाणारं हे हिंदू मंदिर यूएईमधलं पहिलंच पारंपरिक दगडी मंदिर असेल. BAPS हिंदू मंदिर अबू धाबी प्रकल्पाच्या सदस्यांनी केलेल्या दाव्यानुसार, हे मंदिर पुढच्या १००० वर्षांपर्यंत भक्कमपणे उभं राहील.

India Pakistan: पंतप्रधान मोदी पाकिस्तानला लवकरच भेट देणार, पाक अब्जाधीशाचा दावाPakistan Army: बलूच बंडखोरांचा भीषण हल्ला; १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा
गलवान हिंसाचार : चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, ‘ऑस्ट्रेलिया’कडून चीनची पोलखोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here