रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेर्वी खरडेवाडी येथे जागेवरून वाद झाला. दहा जणांच्या टोळक्यानं येथील खरडे कुटुंबावर हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. संशयित आरोपींनी ‘बाहेर पडून दाखवा, संपवून टाकतो’ अशी धमकी देत हा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या घटनेत विनायक खरडे व त्यांचे वडील सुरेश शिवराम खरडे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी सिद्धी विनायक खरडे (वय ३८) या महिलेने पूर्णगड पोलीस ठाण्यात बुधवारी, २ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारदार आणि संशयित आरोपी हे एकाच वाडीत शेजारी राहतात. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद आहेत. यातील तक्रारदार सिद्धी आणि त्यांचे पती विनायक खरडे हे स्वयंपाक घरात चुलीजवळ बसले होते. तेव्हा खरडे यांच्या घराच्या ओटीवर संशयित आरोपी आले. भरत खरडे यांचे नाव घेऊन शिवीगाळ करू लागले. बाहेर पड तुला संपवतो, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली. सिद्धी आणि त्यांचे पती विनायक हे काय झाले हे बघण्यासाठी बाहेर आले. त्याचवेळी सिद्धी खरडे यांचे चुलत दीर संजय बाबजी खरडे, निरंजन संजय खरडे, शैलेश अशोक खरडे, ईश्वरी शैलेश खरडे, अंकुश लक्ष्मण खरडे हे हातात लाठ्याकाठ्या घेऊन येत असल्याचे दिसले. त्यांना बघून दोघेही घाबरून घरात पळून जाऊ लागले. त्याचवेळी निरंजन खरडे याने विनायक यांना पकडले. त्यांना घट्ट धरून ठेवले. आरोपी संजय व अंकुश यांनी विनायक यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पायावर आणि पाठीवर लाठ्याकाठ्यांनी प्रहार केले.

७० फुटांवर ताडाच्या झाडावर मांजात अडकली होती घार, अख्खी अग्निशमन यंत्रणा ३ तास….
Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले-रिक्षाचालकांमध्ये हाणामारी

तक्रारदार सिद्धी यांनी बचावासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी इतर पाच जणांनी सिद्धी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आवाज ऐकून दीर भरत व सासरे सुरेश शिवराम खरडे त्याठिकाणी आले. त्यांनाही संशयित आरोपी संजय, अंकुश व दिलीप याने लाठीकाठीने मारहाण केली. त्यानंतर मोठमोठ्याने बचावासाठी धावा घेतल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दहा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी सांयकाळी उशिरा घडली. या प्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे हवालदार देऊसकर करत आहेत.

Dombivli Fraud : २४ कोटींच्या रकमेचा चेक सादर केला; बँक मॅनेजरला संशय आल्यानंतर बिंग फुटले

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here