रत्नागिरी: रत्नागिरीत (Ratnagiri) करोना विषाणूचा (Corona) प्रादूर्भाव कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पुन्हा खुली होणार आहेत. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रमांनाही अधिक संख्येने उपस्थित राहता येणार आहे. लग्न समारंभासाठीही दोनशे जणांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. पर्यटनाच्या ठिकाणी लसीकरण मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. आठवडा बाजार स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीने मोकळ्या मैदानातच भरवले जाणार आहेत.

Ratnagiri : ‘बाहेर पड, संपवून टाकतो’; जागेवरून वाद झाल्यानंतर १० जणांच्या टोळक्यानं….
रत्नागिरीतल्या शाळा १ फेब्रुवारीपासून

‘असे’ असतील निर्बंध आणि सूट

लग्नसमारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये जास्तीत जास्त २०० लोकांना परवानगी राहील. मोकळ्या जागेत जास्तीत जास्त २०० किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीस परवानगी असणार आहे. भजने, इतर सर्व स्थानिक सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम : सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असेल. सर्व पर्यटन स्थळे, ऑनलाइन तिकीट वितरीत करणारी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे त्यांच्या नियमित वेळेनुसार खुली राहतील. पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी ठराविक वेळी किती व्यक्तींना प्रवेश द्यावा त्याबाबत निर्बंध लादणे आवश्यक असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देणार भेट

स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. रोज रात्री १० ते सळाळी ७ पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. स्पा चालकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असेल. या आस्थापनांमध्ये फक्त अशाच कामांना परवानगी असेल, ज्यासाठी कोणालाही मास्क काढण्याची गरज असणार नाही. या आस्थापनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण (दोन डोस) झालेले असावे.

अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नाही.

समुद्रकिनारे, बागा, उद्याने – सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहतील.

सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक, पर्यटकांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक

करमणूक / थीम पार्क : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहतील.

जलतरण तलाव, वॉटर पार्क : ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी.

सर्व ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक

सर्व नागरिकांनी व सेवा देणाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक

सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होणे बंधनकारक

रेस्टॉरंट्स , उपहारगृहे : ५० टक्के क्षमतेनेच कार्यरत राहतील.

सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक

लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश, दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद

दररोज घरपोच सेवेस परवानगी राहील

नाटयगृहे, चित्रपटगृहे : ५० टक्के क्षमतेनेच कार्यरत.

सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक बंधनकारक

लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश, दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद

पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाला रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत बाहेर फिरण्यासाठी लागू केलेली बंदी उठवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील स्पर्धात्मक खेळांना २५ टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना परवानगी राहील.

ही क्षमता निश्चित केलेल्या एकूण आसन व्यवस्थेच्या २५ टक्के असणे आवश्यक

प्रेक्षकांना उभे राहून आणि फिरून गर्दी करण्यास प्रतिबंध

स्थानिक प्राधिकारणाने निश्चित केलेल्या वेळेनुसार व निर्बंधांसह स्थानिक पर्यटनस्थळे खुली राहतील.

सर्व नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक, संबधित स्थानिक प्राधिकरणाने यावर लक्ष ठेवावे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडा बाजार संबंधित स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीने अटी व शर्तीनुसार सुरू ठेवण्यास परवानगी

शहरी भागातील आठवडा बाजार भरवताना खुल्या / मोकळ्या जागेत / मैदानात भरवण्यात यावेत.

कोणत्याही परिस्थितीत रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यालगत आठवडा बाजार भरवला जाऊ नये

दोन विक्रेत्यांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर ठेवून व सर्व निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक

आठवडा बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांची बैठक व्यवस्था

स्थानिक नगरपंचायत / नगरपालिका / नगर परिषद प्रशासनाकडून निश्चित करून घ्यावी.

या ठिकाणी नागरिक व व्यवसायिकांनी कोविड नियमांचे पालन करावे

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here