न्यूयॉर्क, अमेरिका :

सहकारी महिलेसोबतच्या आपल्या संबंधांना दुजोरा देत ‘सीएनएन वर्ल्डवाईड‘चे अध्यक्ष जेफ जुकर यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र, लैंगिक अत्याचाराचा आरोप फेटाळताना ‘सहमतीनं संबंध’ ठेवल्याचं जुकर यांनी स्वीकार केलंय. जुकर जानेवारी २०१३ पासून ‘सीएनएन’चं जगभरात नेतृत्व करत होते.

CNN मधील ख्रिस कुओमो यांच्या कार्यकाळातील चौकशीचा एक भाग म्हणून मला माझ्या जवळच्या सहकाऱ्याशी सहमतीपूर्ण संबंधांबद्दल विचारण्यात आलं होतं… ज्यांच्यासोबत मी २० वर्षांहून अधिक काळ काम केलं’ असं जुकर यांनी एका निवेदनात म्हटलंय.

Russia Ukraine Crisis: युद्धाच्या छायेतील युक्रेनची भारताकडे मदतीची मागणी
Pakistan Army: बलूच बंडखोरांचा भीषण हल्ला; १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा
‘हे संबंध अलिकडच्या काळात विकसित झाले होते. या संबंधांचा मी उघड स्वीकार करायला हवा होता परंतु मी असं केलं नाही. ही माझी चूक होती. परिणामी मी आज राजीनामा देत आहे’ असंही जुकर यांनी म्हटलंय.

प्रसिद्ध टेलिव्हिजन पत्रकार कुओमो यांची लैंगिक छळाच्या आरोपानंतर गेल्या वर्षी पदावरून गच्छंती झाली होती.

CNN च्या ‘वार्नर मीडिया‘चे सीईओ जेसन कीलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्नरमीडिया न्यूज अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि CNN वर्ल्डवाइड अध्यक्ष पदाचा जेफ जुकर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. यावेळी, त्यांनी गेल्या नऊ वर्षांच्या आपल्या योगदानाबद्दल जेफ जुकर यांचे आभारही मानले.

Covid19: एकदा करोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर पुन्हा चाचणी गरजेची? तज्ज्ञ म्हणतात…
India Pakistan: पंतप्रधान मोदी पाकिस्तानला लवकरच भेट देणार, पाक अब्जाधीशाचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here