सिंधुदुर्ग: न्यायालयासमोर आत्मसमपर्ण करण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘समय बलवान होता है’ अशा आशयाचे ट्विट करत महाविकासआघाडीला इशारा दिला होता. मात्र, हे ट्विट आता नितेश राणे यांना डिलीट करावे लागले आहे. या ट्विटमध्ये भाजपचे मंत्री केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा सीबीआयने अटक केल्यानंतरचा फोटो होता. त्यामुळे नितेश राणे यांना थेट दिल्लीतून हे ट्विट डिलीट करायचे आदेश देण्यात आले का, याची चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडीला इशारा देण्यासाठी नितेश राणे यांनी हे ट्विट केले होते. मात्र, यामुळे नितेश राणे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतली का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अद्यापपर्यंत नितेश राणे यांनी हे ट्विट अचानक डिलीट का केले, याचे कारण गुलदस्त्यात आहे.
Nitesh Rane: अटक होऊनही नितेश राणे निवांत, तुरुंगात कामी आला वाचनाचा व्यासंग?
तर दुसरीकडे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सिंधुदुर्गात येण्याची तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी नारायण राणे सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबई येथून विमानाने ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर जातील. चिपी विमानतळ येथून ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी जातील. त्यानंतर नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यावेळी ते नितेश राणे यांच्या अटकेसंदर्भात काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Nitesh Rane: आत्मसमर्पण करण्यापूर्वी नितेश राणेंना आली अमित शाहांची आठवण; ट्विट करुन म्हणाले…

पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्यात

संतोष परब हल्लाप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांची गुरुवारी कसून चौकशी केली. नितेश राणे यांना बुधवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळी नितेश राणे (Nitesh Rane) यांना चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी साधारण १०.३० वाजता नितेश राणे यांच्या चौकशीला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना समोरासमोर बसवून चौकशी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अखेर दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यानंतर नितेश राणे यांना घेऊन पोलिसांचा ताफा पुन्हा रवाना झाला. त्यानंतर पोलिसांचा ताफा गोव्यात पोहोचल्याची माहिती आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना याठिकाणी का आणले आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here