मेरठ: उत्तर प्रदेशात प्रचारासाठी आलेले एमआयएमचे अध्यक्ष व खासदार हे येथून दिल्लीकडे निघाले असतानाच एका टोलनाक्याजवळ त्यांच्या कारवर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही इजा झालेली नाही. याबाबत खुद्द ओवेसी यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ( )
उत्तर प्रदेशात सध्या रंगली आहे. या निवडणुकीत ओवेसी याचा पक्षही उतरला असून ओवेसी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज ते मेरठमधील किठौर येथे प्रचारासाठी आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते दिल्लीकडे निघाले असतानाच त्यांना अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. ‘तीन ते चार हल्लेखोर होते. त्यांनी छिजारसी टोल नाक्याजवळ माझ्या कारवर गोळ्या झाडल्या. एकूण चार राउंड फायर करून ते पसार झाले. हातातील शस्त्र तिथेच फेकून ते निसटले आहेत. माझ्या कारचा टायर पंक्चर झाला असला तरी मला वा इतर कुणाला कोणतीच इजा झालेली नाही. आम्ही सर्वजण सुखरूप आहेत. दुसऱ्या कारने आम्ही पुढे निघालो आहोत’, असे ट्वीट ओवेसी यांनी केले आहे.