युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याने १ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडितेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर अल्पवयीन पीडित मुलीने मनस्ताप करून घेऊन राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५, ३०६, ३५४ (अ), (१), ४५२ यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.