नवी मुंबई : राज्यातील ४५३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदावर बढती मिळाली असून यामध्ये नवी मुंबई पोलीस दलातील १९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य पोलीस दलातील ४५३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची निशस्त्र पोलीस निरीक्षकपदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी दिले आहेत. ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध खातेनिहाय चौकशी, गुन्हा, निलंबनाची कारवाई झाली आहे, त्यांच्याबाबत संबंधित घटक प्रमुख यांनी पोलीस महासंचालक कार्यालयास कळवावे, असे आदेशात म्हटले आहे.

हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा; येत्या मार्चपर्यंत गरजूंसाठी ५ लाख घरे बांधणार
ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आचारसंहिता लागू आहे, त्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकपदावरून पोलीस निरीक्षकपदावर बढती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अभिनंदन केले आहे. बढती मिळालेल्या नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये मानसिंग बाळासाहेब डुबल, नीलेश बबन तांबे, राम महादेव मांगले, दादासाहेब दत्तात्रय एडके, प्रवीण पांडुरंग पांडे, नितीन शांताराम राठोड, दीपक वसंत शिखरे, दीपक तुकाराम महाडिक, मंगेश भीमराव बोरसे, सचिन पांडुरंग राणे, सचिन पांडुरंग खोद्रे, विजय नामदेव खेडकर, राजेश विजय गज्जल, राजू संपत सुर्वे, संतोष काशिनाथ पवार, मनोजसिंग चौहान, सोपान नांगरे, ज्ञानेश्वर मुकुंदराव भदोडकर, नितीन पगार यांचा समावेश आहे.

मुंबईकरांना दिलासा! करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट, आज ७ मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here