औरंगाबाद : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाहिता आणि तिच्या मुलाला एका घरात डांबून ठेऊन, दीड महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी एकाला मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी (दोन फेब्रुवारी) अटक केली. संभाजी आसाराम शिंदे (२४, रा. अंबडगाव, रोशनगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे आरोपीचे आहे.
या प्रकरणात ३२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी संभाजी शिंदे हा फिर्यादीच्या ओळखीचा असून, तो कंपनीत कंत्राटी तत्त्वावर कामगार म्हणुन काम करतो. त्याने ही विवाहिता आणि तिच्या १४ वर्षांच्या मुलाला कंपनीमध्ये कामाला लावण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार, दोघांकडून कागदपत्रे घेतली आणि दोघांना २६ नोव्हेंबर रोजी कागदी कप बनवणाऱ्या कंपनीत कामाला लावले. तेथून परत येत असताना, त्याने या दोघांना कारमध्ये बोलावले. त्यांना क्रांती चौकाजवळील घरामध्ये डांबून ठेवले आणि त्यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार दीड महिने सुरू होता. दरम्यान, १५ जानेवारी रोजी विवाहिता आणि तिच्या मुलांनी कसाबसा दरवाजा उघडला आणि तेथून पळ काढला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हळदीला मित्रांनी असं काही केलं की नवरदेवच तुरुंगात, VIDEO पाहून तुम्हीही हादराल
पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
संभाजी शिंदे याला गुरुवारी (तीन जानेवारी) प्रथम वर्गदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीने घराचा पंचनामा करायचा आहे. आरोपीच्या साथीदाराला अटक करायची आहे, असे सांगत सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. अटक आरोपीला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.