नाशिकमध्ये ट्रक आणि कॉलेजच्या बसचा भीषण अपघात झाला. औरंगाबाद रोडवर कॉलेजची बस सकाळी सात वाजताच्या सुमारास धामणगावकडे जात असताना, सिग्नलवर बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. कॉलेज बस रस्त्यावरच उलटली. बसमधील अंदाजे २० ते २२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या बसमधून कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करत होते. सिग्नलवर भरधाव ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर बस रस्त्यावरच उलटली. या अपघातात विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे, अशी माहिती काही नागरिकांनी दिली.
कांद्याच्या शेतात गांजाची झाडं लावणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या