औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, पुतळ्याचं लोकार्पण १८ फेब्रुवारी किंवा १९ फेब्रुवारी म्हणजेच, शिवजयंतीच्या दिवशी करण्याची मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केली आहे. अन्यथा महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण आम्ही स्वतः करून घेऊ असा इशाराही समितीने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराजांच्या पुतळ्यावरून नवा वाद पेटला आहे. शिवजयंती महोत्सव समितीने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली,यावेळी हा इशारा देण्यात आला.

गेल्या नऊ वर्षांपासून शिवप्रेमींनी पाठपुरावा, आंदोलने केल्यानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून, कारागिरांकडून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र अजूनही स्थानिक प्रशासनाकडून शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे महानगरपालिका जर चालढकल करत असेल तर, आम्ही स्वतः पुतळ्याचं लोकार्पण करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

आगामी काळात भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेत येणार; सत्तारांच्या विधानाने खळबळ
काम अंतिम टप्प्यात…..

शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान व्हावा यासाठी शिवप्रेमींना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता त्यांच्या संघर्षाला यश आले असून, महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. २५ फूट उंच आणि तब्बल ०८ टन वजन असलेला पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पॉलिश, परिसरातील सजावट अशी कामे सुरू आहे. त्यामुळे लवकरच महाराजांचा पुतळा शिवप्रेमींसाठी खुले करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

धक्कादायक! घरात डांबून ठेवत विवाहितेवर अत्याचार, दीड महिन्यांनी उघडला दरवाजा आणि…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here