औरंगाबाद : आधी सोयगावत नगरपंचायत, त्यानंतर भाजपचे सदस्य फोडून भाजपला धक्का देणारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याचा थेट इशारा दिला आहे. आगामी काळात भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेत येणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवतेज अभियानांतर्गत पदाधिकारी, प्रमुख कार्यक र्त्यांच्या मेळाव्यात गुरुवारी सिल्लोडमध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे भाजपचे अनेक जण संपर्कात असून सिल्लोड- सोयगावमधील पाच हजार भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असून, भाजपला हद्दपार करू असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात अब्दुल बसत्तार यांच्याविरुद्ध भाजप असा राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

हळदीला मित्रांनी असं काही केलं की नवरदेवच तुरुंगात, VIDEO पाहून तुम्हीही हादराल

दगाफटका करणाऱ्या दानवेंचा जावईदेखील सोबत नाही…..

यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांनी युती धर्म न पाळता हॉस्पिटलमध्ये राहून माझ्याविरोधात काम केले. तर जावयाचा प्रचार करण्यास कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. पण नियती पाहा आता त्यांचा जावईदेखील त्यांच्यासोबत नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

Weather Alert : येत्या ३ दिवसांत देशावर आस्मानी संकट, ‘या’ राज्यांना पाऊस-बर्फवृष्टीचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here