बीजिंग, चीन :

रशिया आणि युक्रेन दरम्यान तणाव टोकाला पोहचला असतानाच आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची आज बीजिंगमध्ये भेट होतेय. ही भेट अनेकार्थांनी महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. जेव्हा युक्रेनच्या मुद्द्यावरून पाश्चात्य देशांसोबत तणाव वाढला असताना दोन महासत्तांच्या अध्यक्षांची ही भेट होतेय.

शी जिनपिंग हे जवळपास दोन वर्षांत पहिल्यांदाच एका जागतिक नेत्यासाठी यजमानपद भूषवत आहेत. या दोघांची समोरा-समोर एक बैठकही आयोजित करण्यात आलीय. ‘क्रेमलिन’च्या एका वरिष्ठ सल्लागारानं बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग आणि पुतीन यांची भेट चीनच्या राजधानीत होईल. दोन्ही नेत्यांकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यापूर्वी सुरक्षा आणि इतर मुद्द्यांवर एकमेकांचं मत विचारात घेतील. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही नेते ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

लज्जास्पद! चीनच्या सैनिकाच्या हातात ऑलिम्पिकची मशाल; अमेरिकेची टीका
अमेरिकेने फोडला ‘बॉम्ब’! आयसिसचा म्होरक्या अल-हाशिमी अल-कुरेशीचा खात्मा, बायडन यांची घोषणा
जिनपिंग प्रिय मित्र : पुतीन

युक्रेन संकटा दरम्यान पाश्चिमात्य देशांसोबतच्या वाढत्या तणावामुळे जगातील सर्वात मोठं राष्ट्र आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांतील संबंध दृढ झाले आहेत.

ऑलिम्पिक खेळाच्या उद्घाटनासाठी एकूण २१ जागतिक नेते सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सगळ्यांना मागे टाकत पुतीन हे शुक्रवारच्या उद्घाटन समारंभात आपल्या उपस्थितीची पुष्टी करणारे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

डिसेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी फोनद्वारे झालेल्या संवादात त्यांनी बीजिंगसोबत रशियाच्या मॉडेल संबंधांची प्रशंसा केली. पुतीन यांनी आपल्या चिनी समकक्षांना आपला ‘प्रिय मित्र’ असं संबोधलंय.

युक्रेनबाबत रशियाच्या सुरक्षा चिंतेचा आदर करावा, असं आवाहनही चीनकडून अमेरिकेला करण्यात आलंय.

Russia Ukraine Crisis: युद्धाच्या छायेतील युक्रेनची भारताकडे मदतीची मागणी
गलवान हिंसाचार : चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, ‘ऑस्ट्रेलिया’कडून चीनची पोलखोल
दोन महासत्तांची भेट

युक्रेनच्या सीमेजवळ एक लाख सैन्य तैनात केल्यानंतर रशिया समर्थनाच्या शोधात आहे. रशियाच्या आक्रमक भूमिकेनंतर पाश्चात्य देशांनी युक्रेनवरील हल्ल्याबाबत इशारा दिला होता तसंच रशियाच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.

याचवेळी, १९४९ मध्ये कम्युनिस्ट राजवट प्रस्थापित झाल्यानंतर चीनला ‘सोव्हिएत युनियन’कडून भक्कम पाठिंबा मिळाला होता, हे विसरून चालणार नाही.

१९९० च्या दशकात शीतयुद्ध संपल्यानंतर संबंध पुन्हा रुळावर आले. रशिया आणि चीन यांनी व्यापार, लष्करी आणि भू-राजकीय मुद्द्यांवरही एकत्र काम केलं.

India Pakistan: पंतप्रधान मोदी पाकिस्तानला लवकरच भेट देणार, पाक अब्जाधीशाचा दावा
Pakistan Turkey: तुर्कीशी हातमिळवणी करत पाकिस्तान काश्मीरमध्ये कोणता डाव रचणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here