बीजिंग, चीन:

२०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर हल्ला करणार्‍या लष्करी कमांडचा भाग असलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘च्या (PLA) एका सैनिकाची निवड चीननं ‘बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक’ मशाल वाहक म्हणून केलीय. ही निवड ‘लज्जास्पद’ आणि ‘प्रक्षोभक’ असल्याची टीका अमेरिकेच्या खासदारांकडून करण्यात आलीय.

‘अमेरिकेदून भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा कायम राहील’ असं यूएस सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य रिपब्लिकन सिनेटर जिम रिश यांनी म्हटलंय.

‘२०२० मध्ये भारतावर हल्ला करणाऱ्या आणि इगर मुस्लिमांची कत्तल करणाऱ्या लष्करी कमांडचा भाग असलेल्या एका व्यक्तीची निवड ‘ऑलिम्पिक २०२२ मशाल वाहक’ म्हणून बीजिंकडून केलं जाणं, हे लज्जास्पद आहे. युनायटेड स्टेट्सकडून उइगरच्या स्वातंत्र्याला आणि भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा कायम राहील’, असं ट्विट जिम रिश यांनी केलंय.

गलवान हिंसाचार : चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, ‘ऑस्ट्रेलिया’कडून चीनची पोलखोल
अमेरिकेने फोडला ‘बॉम्ब’! आयसिसचा म्होरक्या अल-हाशिमी अल-कुरेशीचा खात्मा, बायडन यांची घोषणा
‘बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक’ची मशाल वाहून नेण्यासाठी गलवान संघर्षात सहभागी असलेल्या पीएलए सैनिकाचा चीनने समावेश केल्यावरून आणखीही काही अमेरिका खासदारांनी टीका केलीय. जेव्हा भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यांचा विचार केला जातो तेव्हा आम्ही थेट संवाद आणि वादांवर शांततापूर्ण निराकरणाचं समर्थन करतो. परंतु, चीनचं हे पाऊल मात्र आपल्या शेजाऱ्यांना अपमानित करणारं आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आमची सामायिक समृद्धी, सुरक्षा आणि मूल्ये पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या मित्रांसोबत (भारत) उभे आहोत’ असं यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते स्पॉक्स नेड प्राइस यांनी म्हटलंय.

तर, ‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून बीजिंग हिवाळी खेळ २०२२ च्या राजनीतीकरणाचं हे आणखी एक अपमानजनक उदाहरण आहे. २०२० मध्ये गलवान चकमकीत सहभागी झालेल्या सैनिकाची मशाल वाहक म्हणून चीननं केलेली निवड जाणीवपूर्वक करण्यात आली असून ही प्रक्षोभक गोष्ट आहे, असं ट्विट मार्को रुबियो यांनी केलंय.

बुधवारी, खेळांच्या ‘मशाल रिले’मध्ये चीनकडून पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे रेजिमेंटल कमांडर फाबाओ यांची ओळख मशाल-वाहक म्हणून करून देण्यात आली. जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या चकमकीत फाबाओ जखमी झाले होते.

सार्वजनिक वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’च्या बातमीनुसार, हिवाळी ऑलिम्पिक पार्कमध्ये मशाल हातात घेत चीनचं तब्बल चार वेळा ऑलिम्पिक शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियन असलेल्या वांग मेंग ही यांच्याकडून फाबाओ यांनी मशाल हातात घेतली.

Pakistan Army: बलूच बंडखोरांचा भीषण हल्ला; १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा
India Pakistan: पंतप्रधान मोदी पाकिस्तानला लवकरच भेट देणार, पाक अब्जाधीशाचा दावा
बीजिंग ऑलिम्पिकवर भारताचा बहिष्कार

दरम्यान, गलवान खोऱ्यातील संघर्षात सहभागी असलेल्या लष्करी कमांडरला प्रतिष्ठित खेळाचा मशाल वाहक बनवून सन्मानित करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध भारताकडून करण्यात आला. बीजिंगमधील भारतीय दूतावास २०२२ हिवाळी ऑलिंपिकच्या उद्घाटन किंवा समारोप समारंभास उपस्थित राहणार नसल्याची घोषणा गुरुवारी भारताकडून करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनचं हे पाऊल ‘खेदजनक’ असल्याचं म्हटलंय.

Russia Ukraine Crisis: युद्धाच्या छायेतील युक्रेनची भारताकडे मदतीची मागणी
Covid19: एकदा करोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर पुन्हा चाचणी गरजेची? तज्ज्ञ म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here