औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळ्या झाडत हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे ओवेसिंवर करण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थत एमआयएमकडून आज राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

जलील यांनी ट्विट करत म्हटले आहे की,देशभरातील सर्व एमआयएम पक्षाच्या शाखातर्फे शुक्रवारी शांततापूर्ण निषेध नोंदवला जाणार आहे. तसेच ओवेसिंवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या अनुषंगाने होणाऱ्या प्रत्येक सभेला ओवीसींना सुरक्षा देण्याची मागणी सुद्धा करण्यात येणार असल्याचे जलील म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि मुंबईचे पदाधिकारी राज्यपालांना निवेदन देणार असल्याचं जलीक म्हणाले.

बापरे! खोकला जाईना म्हणून महिला डॉक्टरांकडे गेली, फुप्फुसात असं काही दिसलं की डॉक्टरही चक्रावले

औरंगाबादमध्येही निदर्शने…..

ओवेसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्येही दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएम कडून निदर्शने केली जाणार आहे. तसेच ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे.

हल्ला करणारे ताब्यात…..

ओवेसी मेरठ येथून दिल्लीला परतत असताना हापुडमधील छिजारसी टोल नाक्याजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून ओवेसी यांनी दिल्लीत दाखल होताच याप्रकरणी चौकशीची मागणी केली व गंभीर आरोप केले आहेत.

आगामी काळात भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेत येणार; सत्तारांच्या विधानाने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here