मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी मुंबईहून कोकणात लांजा परिसरात आपल्या मामाकडे आली होती. मुंबईत राहणाऱ्या तिच्या प्रियकराने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे नैराश्य आल्यानं तिनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ज्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, त्याने लग्नास नकार दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित मुलाविरोधात मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मामाकडे आली होती मुलगी
मुलीचे मुंबई राहणाऱ्या २१ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी ४ जानेवारी २०२२ रोजी कोकणातील रत्नागिरीत लांजा परिसरातील मामाकडे काही दिवसांसाठी राहायला आली होती. त्याचवेळी तिच्या प्रियकराने लग्नास नकार दिला. यामुळे नैराश्येतून तिने २७ जानेवारी २०२२ रोजी मामाच्या घरी असताना अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेनंतर नातेवाइकांनी तिला सुरुवातीला लांजातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रग्णालयात नेण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगी मुंबईतील वरळी परिसरात राहत होती. तिच्या वडिलांनी या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर