बीड : बंडातात्या कराड यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून, बीडमध्ये भाजप आक्रमक झाली आहे. बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये, बंडातात्या कराड विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जोपर्यंत बंडातात्या कराड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असून या ठिकाणाहून उठणार नाहीत. असा पवित्रा भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
मात्र, बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हाभरात चांगले संतापजनक लाट उसळली पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या वक्तव्याचा निषेध केलेला पाहिला मिळतोय. मात्र, आता या विषयावर नेमकं काय घडतय कशा पद्धतीने कारवाई होईल हे पाहण्याजोगा आहे.