कल्याण: कल्याण (कल्याण) तालुक्यातील म्हारळ गावातील बीअर शॉप आणि शेजारी असलेल्या दूध डेअरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

कल्याण शहराजवळील म्हारळ गावातील नाक्यावरच एक बीअर शॉप आणि त्याच्या शेजारीच बालाजी डेअरी आहे. काल पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी आधी बिअर शॉपचे शटर उचकटून शॉपमधील रोकड आणि बिअरचा बॉक्स लंपास केला. चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तसेच शेजारी असलेल्या बालाजी डेअरीचे शटर फोडून त्या डेअरीतील २६ हजारांची रोकड लंपास केली. शहराला लागूनच असलेल्या गावांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी होऊ लागली आहे. बिअर शॉप आणि शेजारी असलेल्या दूध डेअरीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळगाव पोलीस अॅक्शन मोडमध्ये; चोपड्यानंतर अमळनेरमध्येही गुन्हेगारांची धिंड
धक्कादायक! बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला, अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

दुचाकीवरून बॅग लंपास करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवलीत राहणारे ६० वर्षीय नरेश रामचंदानी १ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास व्हिनस चौक ते लालचक्की दरम्यान दुचाकीने जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील बॅग लंपास केल्याची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बॅगमध्ये १ लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्रे आणि इतर वस्तू होत्या, असे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरू केल्यानंतर आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Mumbai : मॉकड्रीलवेळी अपघात, जखमी अग्निशमन जवानाची मृत्युशी झुंज अपयशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here