इस्लामाबाद, पाकिस्तान :

भारताचे लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी नुकत्याच केलेल्या शस्त्रसंधी संबंधीच्या वक्तव्यावर पाकिस्तानी लष्करानं तीव्र आक्षेप व्यक्त केलाय. पाकिस्तानी लष्करानं एक निवेदन जारी करून, ‘नियंत्रण रेषेवर युद्धविरामाच्या स्थितीबाबत भारतीय लष्कराचा स्वतः मजबूत स्थितीत असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे’ असं म्हणत नरवणे यांचा दावा फेटाळून लावलाय.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून भारत आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि तोफा शांत आहेत.

यापूर्वी गुरुवारी पाकिस्तानला कठोर इशारा देताना, ‘नियंत्रण रेषेवर युद्धविराम सुरू आहे कारण भारतानं स्वतःची मजबूत स्थिती कायम केलीय’ असं भारतीय लष्करप्रमुखांनी म्हटलं होतं.

जनरल नरवणे यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी लष्करानं एक निवेदन जारी केलंय. भारतीय लष्करप्रमुखांचं वक्तव्य पूर्णत: दिशाभूल करणारं आहे. पाकिस्तानला नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजुंना राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काळजी असल्यानं युद्धविराम मान्य करण्यात आल्याचा’ दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय.

लज्जास्पद! चीनच्या सैनिकाच्या हातात ऑलिम्पिकची मशाल; अमेरिकेची टीका
युक्रेन संकटादरम्यान… आज बीजिंगमध्ये होणार जिनपिंग – पुतीन यांची भेट

चुकीचा अर्थ लावू नये : पाकिस्तान

‘कोणत्याही पक्षानं आपल्या ताकदीचा आणि दुसऱ्याच्या कमजोरीचा चुकीचा अर्थ लावू नये’ असंही पाकिस्तानी लष्कराने म्हटलंय.

भारत वेगवेगळ्या, कठीण आणि बहुस्तरीय सुरक्षा आव्हानांना तोंड देत असल्याचं वक्तव्य गुरुवारी जनरल नरवणे यांनी केलं होतं. उत्तरेकडील सीमेवरील घडामोडींनी पूर्णपणे तयार असून आणि सक्षम सैन्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता, आण्विक शक्तींसह सक्षम असणाऱ्या शेजार्‍यांसह सीमेवर वाद तसंच राज्य-प्रायोजित प्रॉक्सी युद्धांमुळे सुरक्षा यंत्रणा आणि संसाधनांसमोरील आव्हानं वाढल्याचंही नरवणे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं होतं.

विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी काडीमोड, मुस्लीम देशातला नवा रेकॉर्ड
Jeff Zucker: लैंगिक अत्याचार नाही, सहमतीनं संबंध; CNN अध्यक्षांचा अखेर राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here