मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेते किरण माने चर्चेत आहेत. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच्या आरोपामुळे मनोरंजनसृष्टीत प्रचंड खळबळ उडाली होती. याच संदर्भात किरण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
किरण माने प्रकरणाला नवं वळण; वाहिनीकडून अभिनेत्यावर गंभीर आरोप
मालिकेतून काढल्यानंतरही अनेक कलाकारांनी किरण मानेंना पाठिंबा दिला होता तर, किरण माने हे प्रसिद्धीसाठी हे सगळं करत असल्याचं अभिनेते आदेश बांदेकर यांनी केलं होतं. याच वक्तव्यावर किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली असून बांदेकर यांना टोला लगावला आहे.
राजकीय भूमिका कशाला हवी?; नाना पाटकेर यांनी किरण मानेंना फटकारले
स्टार प्रवाह या वाहिनीवर आदेश बांदेकर यांची मालिका सुरू आहे. ते या मालिकेचे निर्माते आहेत. त्यात त्यांचा मुलगाही काम करत असल्यानं त्यांना असं बोलावं लागलं असेल,असं माने यांनी म्हटलं. तर, मी सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध नाही तर अभिनेता म्हणून लोकप्रिय आहे, असा टोलाही त्यांनी बांदेकर यांना लगावला.

काय आहे नेमकं प्रकरण?
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडतात म्हणून माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच्या आरोपामुळं मनोरंजनसृष्टीत प्रचंड खळबळ माजली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होत या घटनेचा निषेध नोंदवला होता. तर अमोल कोल्हे, आदेश बांदेकरांनी किरण मानेच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. खासदार म्हणून संसदेपासून ते मतदारसंघापर्यंत आपण विविध राजकीय विषयांवर भूमिका घेत आलो आहोत. पण, त्यामुळे कलाकार म्हणून कोणत्याही वाहिनीकडून टाळले गेल्याचा आतापर्यंतचा माझा अनुभव नाही, असं कोल्हे यांनी म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here