पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची साक्ष घेण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद घेण्यात आली होती. तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. (Koregaon Bhima Violence Case)

एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्ला यांची साक्ष महत्त्वाची आहे. त्यांची साक्ष आयोगासमोर व्हावी, असा अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी आयोगाकडे सादर केला होता. हा अर्ज मान्य करत आयोगाने राज्याच्या गृह विभागामार्फत शुक्ला यांना समन्स बजावले होते.

पुण्यात अचानक बंद केला उड्डाणपूल; वाहनांच्या तब्बल ५ किमीपर्यंत लागल्या रांगा!

विश्वास नांगरे पाटलांचीही साक्ष घेणार

कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, त्यावेळी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. त्यामुळे त्यांचीही साक्ष घेतली जाणार आहे.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचाराचे पडसाद पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. या घटनेच्या आसपासच्या काळात रश्मी शुक्ला या पुणे शहराच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे शुक्ला यांच्या साक्षीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here