मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर फक्त २० वर्षांची आहे. अवनीत अभिनया सोबतच एक उत्तम डान्सर आणि सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर आहे. आज ती टीव्हीमधील सर्वात लोकप्रिय, प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळखली जात असून लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एवढ्या लहान वयात अवनीत कौरने स्वत:ला एक महागडी रेंज रोवर गिफ्ट केली आहे. तिने तिच्या कुटुंबाचे या आलिशान गाडीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. तसंच तिने केक कपात हा अविस्मरणीय क्षणं साजरा करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. पण अवनीतने विकत घेतलेल्या रेंज रोवर या गाडीची किंमत ऐकलीत तर तुम्ही थक्क व्हाल.
अवनीतचा रेंज रोवर गाडी सोबतचे फोटो आणि हा क्षण साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे चाहेते आणि मित्रमंडळी तिला शुभेच्छा देत तिचं कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान अवनीतने ही गाडी किती लाखात घेतली याचा खुलासा केला नसला तरी या गाडीची भारतात किंमत ८३ लख रुपये इतकी आहे.
अवनीतने नवीन आलिशान कारसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं, ‘हे माझं यावर्षीचं स्वप्न आहे, जे पूर्ण झालं.’ यासोबतच तिने अनेक हॅशटॅगही जोडले आहेत. या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अवनीत तिच्या स्वप्नं पूर्ण झल्याने ती खूप खुश आहे.
अवनीत कौरने तिच्या करिअरची सुरुवात झी टीव्हीच्या ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमातून केली. नंतर तिने ‘हमारी सिस्टर दीदी’ या मालिकेतून अभिनयाच्या जगत पदार्पण केलं. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसली आहे. जवळ-जवळ आठ वर्ष छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर अवनीत आता ‘टिकू वेड्स शेरू’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.