मामींचा नवा शोध: मुंबईतील ट्राफिकमुळे ३ टक्के डीवोर्स (घटस्फोट) होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा, अशी खोचक टिप्पणी मनिषा कायंदे यांनी केली. यावर आता अमृता फडणवीस काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
अमृता फडणवीसांच्या वक्तव्यामुळे करमणूक: महापौर
अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघत असतो. दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे की ३ टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?
मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले होते. मी मुंबईतील समस्यांवरुन बोलते तेव्हा अनेक महिला नेत्या माझं मानसिक संतुलन गेलं आहे, अशी टीका करतात. पण मी एक सामान्य स्त्री म्हणून बोलते. मी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आहे, हे तुम्ही विसरुन जा. मी एक सामान्य बाई आहे. मीदेखील दररोज सामान्य स्त्रियांप्रमाणे घराबाहेर पडते. मलाही खड्डे आणि ट्रॅफिक जॅममुळे त्रास होतो. आता यावर बोलणार नाही तर काय करणार? मुंबईत वाहतूक कोंडीमुळे जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे. कारण पती-पत्नी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला होता.