पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशा विश्वास महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी व्यक्त केला आहे. आयुक्तांनी शुक्रवारी नागरिकांशी ‘ट्विटर’द्वारे संवाद साधला. या वेळी प्रश्नोत्तरांमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची ‘डेडलाइन’ आयुक्तांनी जाहीर केली.

महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी ‘ट्विटर’वरून नागरिकांची मते जाणून घेतली. शहराची स्वच्छता, त्यातील नागरिकांचा सहभाग आणि महापालिकेशी संबंधित अन्य विषयांवरही त्यांनी चर्चा केली. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा मते #आयुक्तांशीचर्चा किंवा #AskPMCCommissioner हा हॅशटॅग वापरून दुपारी दोन वाजेपर्यंत ट्विट करावेत, असे आवाहन पालिकेने केले होते. यातील काही प्रश्नांना आयुक्तांनी उत्तरे दिली.

संसदेत सुप्रिया सुळेंसोबत खडाजंगी झाल्यानंतर मतदारसंघात सुजय विखे म्हणाले…

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आला होता. यावर आयुक्तांनी पुलाचे काम सप्टेंबर २०२४पर्यंत पूर्ण होईल. या उड्डाणपुलाची रचना करताना ‘महामेट्रो’चा सल्ला घेतल्याचे स्पष्ट केले. पुण्यात खूप बंगले असून, झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी उद्यान विभागाशी संपर्क साधणे अवघड होते आहे. झाडांना लगडलेले नारळ कसे काढायचे अशा समस्याही आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या. या प्रश्नांची आयुक्तांनी दखल घेऊन कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

राजकारण्यांच्या वाढदिवसांचे पोस्टर्स कधी काढण्यात येणार, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, रस्त्यालगत टाकण्यात येणारा कचरा, अरुंद रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग, बेकायदा पथारी व्यावसायिक, पदपथांवरील अतिक्रमण; तसेच मीटरने व्यवसाय करण्यास काही रिक्षा चालकांकडून देण्यात येणारा नकार आदी प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी केली.

कोरेगाव भीमा हिंसाचार: रश्मी शुक्ला यांची साक्ष घेतली; नांगरे पाटलांनाही बोलावणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here