गोरखपूर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर एकही गुन्हा नोंद नसल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीतही गेल्या चार वर्षांत ५९ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी माहिती दिली आहे. योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.

या पार्श्वभूमीवर ही माहिती उल्लेखनीय मानली जात आहे. योगी आदित्यनाथ हे २०१७मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्या वेळी त्यांची संपत्ती ९५.९६ लाख रुपये होती. ती आता एक कोटी ५४ लाख ९४ हजार रुपयांची झाली आहे. त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम आहेत. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची संपत्ती ७२ लाख १७ हजार रुपयांची होती. योगी यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही.
Abu Bakar Arrested १९९३ मुंबई बॉम्बस्फोट: मोस्ट वॉन्टेड अबू बकरला यूएईत अटक; दाऊदला हादरा
२०१४मध्ये त्यांच्याकडे तीन अलिशान गाड्या होत्या. योगींकडे १२ हजार रुपयांचा मोबाइल फोन आहे. एक लाख रुपयांचे रिव्हॉल्वर आणि ८० हजार रुपयांची रायफल आहे. दिल्लीतील बँकेत ३५.२४ लाख रुपयांची ठेव आहे. गोरखपूर आणि लखनौतील बँकेतही त्यांचे खाते आहे. योगींच्या कानातील दोन तोळे सोन्याचे असून, १२ हजार रुपयांच्या रुद्राक्षासाह गळ्यात सोन्याची चेन आहे. योगींच्या नावावर अचल संपत्ती नाही.

कानपूरच्या प्रचारात पाकिस्तानच्या घोषणा

दरम्यान, कानपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. समाजवादी पक्षाचे बिठूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुनींद्र शुक्ला यांनी टिकरा भागात प्रचार फेरी काढली. त्यात कार्यकर्त्यांनी ‘सायकल का बटन दबाना है, नया पाकिस्तान बनाना है’ अशा घोषणा दिल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

Charanjit Singh Channi: चन्नी झुकेगा नही!; ‘त्या’ कारवाईवरून काँग्रेसने सुनावला ‘पुष्पा’चा डायलॉग!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here