औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत सचिवांना भेटीसाठी गेले होते. मात्र या वेळी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या घाटीतील २५० डॉक्टरांनी आज (५ फेब्रुवारी) सामूहिक रजा घेत, संपावर गेली आहेत. विशेष म्हणजे सामूहिक रजाबाबत संबंधित विभागाला पूर्वसूचना सुद्धा देण्यात आली आहे. मात्र यामुळे याचे परिणाम रुग्णांवर होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ सचिवांची भेट घेण्यासाठी आणि सकारात्मक चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईत गेले होते. मात्र, याठिकाणी मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संघटना संतप्त झाली आहे. रिक्त पदे, अपुरा निधी, अस्थायी सहायक प्राध्यपकांसह तदर्थ, मानद डॉक्टरांद्वारे गाडा हाकला जातो. मात्र तरीही जर अपमानास्पद मिळत असेल तर,ही सेवा करावी की नाही, अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली.

निर्बंध आणखी सैल होणार, मार्चमध्ये काय असेल करोनाची स्थिती? वाचा सविस्तर
औरंगाबाद शासकीय रुग्णालयातील ( घाटी ) एकाचवेळी २५० डॉक्टरांनी सामूहिक रजा टाकल्याने याचा परिणाम रुग्णांवर होणार आहे. तर आज डॉक्टरांचे आंदोलन असल्याने निवासी डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा देऊ. तसेच नियोजित कुर्ता पायजामा शस्त्रक्रिया होणार नाहीत. केवळ आपत्कालीन रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करीत आहोत,अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर यांनी दिली आहे.

Breaking : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकरला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here