औरंगाबाद न्यूज लाइव्ह: धक्कादायक! साखर कारखान्यात गरम रसाच्या टाकीचा स्फोट; अंगावर शहरा आणणारा VIDEO आला समोर… – breaking news explosion of hot juice tank in sugar factory 2 seriously injured here is video
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या बारामती अँग्रो साखर कारखान्यात गरम उसाचा रस वाहतूक करणारी टाकी फुटल्याने, मोठा स्फोट झाला असून, ज्यात दोन कामगार गंभीररीत्या भाजले आहे. या दोन्ही कामगारांवर औरंगाबाद शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बारा वाजता गरम ऊसाचा रस वाहतूक करणारी टाकी अचानक फुटून त्यातून उडालेल्या गरम रसामुळे भाजल्याने दोन कामगार जखमी झाले आहे.सागर राठोड (रा. आंबा तांडा ) व आण्णासाहेब पवार ( चापाणेर ) अशी जखमींची नावे आहेत. या दोन्ही कामगारांना कारखान्याचे एचआरओ सतीश तेलहंडे यांनी तात्काळ कन्नड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र गंभीर भाजल्याने दोघांनाही औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
साखर कारखान्यात गरम उसाचा रस वाहतूक करण्यासाठी टाकीचा वापर केला जातो. शुक्रवारी बारामती अँग्रो साखर कारखान्यात अचानक ह्या टाकीचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये मोठी धावपळ उडाली. तर टाकी फुटल्याने गरम ऊस खाली जमिनीवर कोसळत होता, ज्यातून गरम वाफा निघत होत्या. ह्या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असून, उकळत रस पाहून अंगावर शहरा उभा राहत आहे.