हरयाणात बुधवारी एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सुरुवातीला गुरुग्राममध्ये १० करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता ९ जणांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. हरयाणातील २९ करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १३ जणांना यशस्वी उपचारानंतर आतापर्यंत घरी सोडलं गेलंय. तर १६ जणांवर उपचार सुरू आहेत.
दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझच्या कार्यक्रमात राज्यातील ५०३ जण सहभागी झाले आहेत. यातील ७२ जण विदेशी आहेत. त्यांची माहिती मिळवण्यात येत आहे, असं हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितलं. या सर्वांना क्वारंटाइन करण्याचे काम सुरू आहे, असं विज म्हणाले. सर्व ५०३ जणांची वैद्यकीय केली जाणार आहे. जे पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांच्यावर हॉस्पिटलमधील स्वतंत्र विभागात उपचार करण्यात येतील. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, असं अनिल विज यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times