आत्महत्येपूर्वी शिल्पाने एक पत्र लिहिले असून पोलिसांनी ते हस्तगत केले असून त्यात काय लिहिलं ते सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मयत शिल्पाच्या भावाच्या तक्रारीवरून पती गजानन जीरोनकरला अटक करण्यात आली आहे. मयत शिल्पाच्या भावाने शिल्पाचा माहेरावरून पैसे आणण्यासाठी सासरचे मंडळी तिचा छळ करत असल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी शिल्पाच्या पतीला भाग्यनगर पोलिसांनी अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
आत्महत्येची दुसरी घटना ही उचभ्रू वस्तीतील शिवाजीनगरची आहे. शहरातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ असलेल्या अर्जुन मापारे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दंतरोग तज्ञ असलेले सागर मापारे हे वाडिया फॅक्टरी भागात पत्नी मुलांसह राहतात. त्यांच्या पत्नी अनुपा यांनी काल दुपारी मुलांना खायला घालून त्या आपल्या रूममध्ये गेल्या. आई बराच वेळ झाली तरी बाहेर आली नसल्याने मुलांनी दरवाजा ठोटावला. मात्र, आईने प्रतिसाद दिला नाही. त्या नंतर मोलकरणीने खिडकीतून पाहिले असता अनुपा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. दरम्यान, अनुपा यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आत्महत्येच्या या दोन्ही घटनांतील महिला या चांगल्या कुटुंबातील आहेत. यातील शिल्पा जीरोनकर ही ३२ वर्षीय असून तिला एक मुलगा आहे. तर अनुपा या देखील ३५ वर्षाच्या असून त्यांनाही दोन अपत्य आहेत. दोघीही उच्चशिक्षित चांगल्या कुटुंबातील या महिलांनी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे. या दोन्ही आत्महत्येमागचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.