पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसमाळ येथे गेल्या अनेक महिन्यांपासून काही हॉटेलवर बाहेरून मुली, महिला आणून सर्रास वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध युनिट व खुलताबाद पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे खात्री करण्यासाठी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हैसमाळ येथील आर्या हॉटेलवर एक डम्मी ग्राहक पाठवला.
यानंतर हॉटेलच्या आत गेलेल्या डम्मी ग्राहकाने खात्री होताच, पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध युनिट व खुलताबाद पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकत देहव्यापाराचा व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल चालक चंद्रकलाबाई भिकाजी साठे आणि महेश अंकुश भालेराव या दोघांना महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असताना रंगेहाथ पकडले. तर हे दोघेही पैसे घेऊन महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.