नशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील तपोवन कॉर्नर येथे ही घटना घडली आहे. (Shivshahi Bus Accident)

नाशिक-औरंगाबाद शिवशाही बस ही तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाखालील ४४ नंबरच्या खांबावर ही बस आदळली. तसंच एका दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Anil Deshmukh:अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, आता दोन्ही मुलांनाही कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

मृत व्यक्तीबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, शिवशाही बसच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. राज्यात याआधीही अनेकदा या बसचा अपघात होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शिवशाही बसचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here