औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील शंभूनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने परीक्षेच्या तणावातून घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.उषा कृष्णाचंद्र चौधरी (१८ रा. शंभूनगर) असे मृत तरुणीचे नाव असून, ही घटना ३ जानेवारी (गुरुवार) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत वर्गात शिक्षण घेत असलेल्या उषा ही देवानगरी परिसरातील एका महाविद्यालयात शिकत होती. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी उषा त्यासाठी तयारी करत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. गुरुवारी गुरुवारी उषाचे वडील नियमित कामासाठी गेले होते. त्यामुळे घरात असलेल्या आईला उषाने अभ्यासासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई घराबाहेर जाताच उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

महाराष्ट्र हादरला! बड्या घरच्या २ उच्चशिक्षित महिलांचं टोकाचं पाऊल, बर्थडेच्या दिवशी घडलं भयंकर
पेपर आणण्यासाठी गेलेली उषाची आईने काही वेळानंतर घरी येऊन दार उघडून बघितले असता उषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे पाहून आईला धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजार धावून आले. त्यांनी उषाला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

परीक्षेचा होता तणाव…

उषा ही एक हुशार अशी विद्यार्थिनी होती. शाळा बंद असल्यापासून ती सतत घरी अभ्यासातच व्यस्त असायची. तसेच परीक्षेबाबत ती नेहमीच तणावात असायची. त्यामुळे उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे.

धक्कादायक! पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, कारवाई करणारं पथकंही चक्रावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here