चंद्रपूर : कुणाचा पाठीवर कुणाच ओझं असेल हे सांगता येत नाही. मात्र, चंद्रपूरतील गाढवे आपल्या पाठीवर तस्करीचं ओझं वाहत आहेत. रेती तस्करांनी चक्क गाढवाचा पाठीवरून रेती तस्करी सूरू केली. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरात पुढे आला. तस्करीसाठी मुक्या जनावरांना जूपलं गेलं. विशेष म्हणजे आमदारांचा फार्म हाऊसपासून हाकेचा अंतरावर हा प्रकार सूरू आहे. महसूल विभागाची कार्यवाही टाळण्यासाठी गाढावांना अस जूंपनं हे निर्दयीच.
चक्क गाढवाच्या पाठीवरून रेती तस्करी सूरू केली. इरई नदीचा पात्रातून गाढवाचा पाठीवर रेती वाहून नेल्या जाते. ज्या भागातून ही तस्करी सूरू आहे, त्या भागात माजी मंत्री, माजी खासदार, विदयमान आमदारांचा वास्तू आहेत. त्यामुळे या तस्करीला राजकीय बळ तर नाही ना ? अशी चर्चा आता शहरात रंगली आहे. जिथून रेतीचा उपसा सूरू आहे, त्याचा जवळच शहरासाठी पाणी पुरवठा करणारे इंटक वॉल आहे. त्यामुळे याची आता जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.