मुंबई: महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून आज दिवसभरात राज्यात ३३ नवे करोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यातील ३० रुग्ण एकट्या मुंबईतील असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, करोनाने आज आणखी तीन जणांचा बळी घेतला असून राज्यातील मृतांची संख्या १३ झाली आहे.

राज्यात आज करोनाबाधीत ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलडाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे.

राज्यात आतापर्यंत ४२ करोना बाधीत रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत आणखी दोन मृत्यू

महाराष्ट्रात आणखी तीन करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या १३ झाली आहे. पालघरमधील करोनाबाधीत व्यक्तीचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला होता. या ५० वर्षीय व्यक्तीवर २८ मार्चपासून पालघर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीच्या पत्नीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मुंबईत आज दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा तसेच एका ५१ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here