औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या १४ जागांसाठी निवडणूक झाली होत. यातील सात जागा बिनविरोध तर उरलेल्या ७ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामुळे आज संघाच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तर भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षपदी निवड करण्याचं एकमत झाले असून, उपाध्यक्षपदासाठी खरी लढत होणार आहे.
शिवसेना विरोधात शिवसेना…
उपाध्यक्षपदासाठी तीन अर्ज आले असून ज्यात एक काँग्रेस आणि दोन शिवसेनेचे आहेत. मात्र ऐनवेळी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून, शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहे. मात्र एक जण भुमरे समर्थक आहे तर दुसरा सत्तार समर्थक आहे. त्यामुळे दोन्ही मंत्री आपलाच माणूस उपाध्यक्ष पदावर बसावा यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता यातील कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यासाठी दोन्ही नेत्यांकडून बैठकावर बैठका सुरू आहे.