शुक्रवारी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

नितेश राणे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही.
हायलाइट्स:
- नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती
- रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते
नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी काल न्यायालयात केली होती. कणकवली दिवाणी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे यासंबंधीचा अर्ज दिला होता. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. याबाबत त्यांनी न्यायालयाला कळविले असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
जेलवारीची वेळ आल्यावर नितेश राणेंची तब्बेत कशी बिघडते, दीपक केसरकर यांचा खोचक सवाल
दरम्यान काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणारे आमदार नितेश राणे यांची तब्येत काहीच क्षणात कशी काय बिघडते?, असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टर देखील ते आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ शकतो. यापूर्वी आपण गृहमंत्री असताना त्यांनी असाच बनाव केला होता. त्यावेळी त्याची मी पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना कोठडीत पाठवले होते. परंतु यावेळी असे काहीच झाले नाही. असेच होत राहिले तर लोकांच्या मनातील भीती कमी होऊ शकते. त्याची खरीच तब्ब्येत बिघडली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
ज्यांच्यामुळे नितेश राणे तुरुंगात गेले, ते संतोष परब काय म्हणाले
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता
कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, असा अर्ज तुरुंग अधीक्षकांना पाठवला होता. ही मागणी मान्य करत नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bjp union minister narayan rane will meet nitesh rane in district hospital oros sindhudurg maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network